आम्ही विद्यावार्ता नावाची आंतरविद्याशाखीय बहुभाषिक संशोधन पत्रिका गेल्या तीन वर्षापासून प्रकाशित करीत आहोत. यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील कोणत्याही विषयाचे संशोधन लेख प्रकाशित करता येतात. विद्यावार्ता या नियतकालीकास ISSN (NO.२३१९ ९३१८) क्रमांक असून या मध्ये उच्चशिक्षणातील दर्जेदार लेखन प्रसिद्ध केले जात आहे. या जर्नल साठी भारत सरकार चे तम मिळाले असून हे आमच्या गुणवत्तेचे प्रतिक आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी या जर्नलला मान्यता दिली आहे व अधिकृततेची शिफारस केली आहे.
विद्यावार्ता संशोधनपत्रिकेच्या प्रत्येक महिन्यात प्रकाशित होणाऱ्या अंकासठी लेखन मागवीण्यात येत आहे. आपले लेखन vidyawarta@gmail.com किवा gbaया E Mail वर पाठवावे. आपले लेखन ISM DVB TT Dhurv अथवा कृतीदेव ५५ या मराठी font मध्ये अथवा times new roman मध्ये चालेल. एमंएस वर्ड अथवा पेजमेकर या प्रोग्राममध्ये आसवे. लेखन आपले स्वतः चे असावे.
विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि भाषेसाठी विद्यावार्ता ही एक खुली अंतर्राष्ट्रीय पत्रिका आहे, अंतरराष्ट्रीय दर्जाच्या सहकार्याच्या सामिक्षा मधून गुणवत्ता पूर्ण संशोधन करून संशोधक, विद्यार्थी आणि सर्व सामान्य लोकांसाठी विद्यावार्ता समर्पित आहे. हि संशोधन पत्रिका विज्ञान, सामाजिकशास्त्रे आणि भाषेमधील मराठी हिंदी आणि इंग्रजी विभागामधील संशोधनासाठी अधिकाधिक वाव देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. संशोधन पत्रिकाच्या मुख्य विषयामध्ये सध्याच्या नवीन संशोधनावर केंद्रित आहे. संशोधन पत्रिका व्यावहारिक महत्व आणि शैक्षक्षिक मूल्याबरोबर मुलभूत संशोधनचे काम करते.
आपले लेख दाखल करण्यापूर्वी हि खात्री आवश्य करा कि दाखल करत असलेला लेख किवा संशोधन पत्र या पूर्वी कोणत्याही चर्चासत्रात, संशोधन पत्रिकेमध्ये छापलेली अथवा वाचालेली नसावी. मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सर्व लेख सुस्पष्ट, व्याकरण चुका नसलेले असावेत. लेख ५ पानाचा असावा. जास्त पानाच्या लेख किवा संशोधन पत्रिकेसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल
संशोधन लेखमध्ये लेखकाचे नाव, पत्ता, शीर्षक क्रमाने लिहावेत. या मध्ये इमेल ID असावा. पारिभाषिक शब्द, अनुक्रमणिका, ओळख साहित्य, वापरण्यात आलेले संदर्भ याचा सविस्तर उल्लेख करावा. निष्कर्ष असल्यास स्वतंत्र समास सोडून लिहावा
विद्यावार्ता नावाची आंतरविद्याशाखीय बहुभाषिक संशोधन पत्रिकेची वार्षीक वर्गणी 1200/- रुपये असून सर्वाना रजीस्टर्ड पोस्टाने अंक घरपोच पाठविले जातत. काही अडचण असेल तर ७५ ८८ ०५ ७६ ९५, अथवा ९८५०२०३२९५ या क्रमांकवर संपर्क करा