पीररिव्हयु नियतकालिक विद्यावार्ता
अलिकडे अेपीआय नियमाची अंमलबजावणी करावी लागत आहे. छोटया, छोटया केलेल्या कामाची लेखी नोंद ठेवावी लागत आहे. त्यात रेफरिड जर्नल किंवा पीररिव्हयु नियतकालिकात लेख छापुन आल्यास थर्ड कॅटेगिरीत १५ मार्क मिळत आहेत. पीर (म्हणजे निरखणे, न्याळहाळणे) रिव्हयू नियतकलिक म्हणजे असे नियतकालिक ज्यामध्ये प्रकाशित झालेला प्रत्येक लेख हा विषय तज्ञांकडुन तपासुन छापलेला असतो. विद्यावार्ता (ISSN २३१९ ९३१८) हे आशा प्रकारचे दर्जेदार पीररिव्हयु नियतकालिक आहे. परिषदेतील प्रोसिडिंग मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांना सुध्दा पीर रिव्हयुड म्हणायला हरकत नाही. पण ते नियतकालिकात मोडत नाही.
डबल ब्लाइंड
एखादे नियतकालिक पीअररिव्हयुड आहे का नाही हे ओळखायचे असेल तर त्या नियतकालिकाचे पहिले कींवा शेवटचे पेजेस पाहिले तर आपल्याला समजु शकते की ते कशा प्रकारचे नियतकालिक आहे. प्रथम त्यात संपादकिय मंडळातील सदस्यांची नावे दिली आहेत का, त्याच बरोबर जर त्यात एका पेजवर ‘इन्ट्रकशन्स फॉर ऑथर’ असे असेल तर असे समजा की ते नियतकालिक पीररिव्हयुड आहे. बीड येथून प्रकाशित होणा-या विद्यावार्ता जर्नलमध्ये या गोष्टी आपनास पाहायला मिळतील. जर त्यातील इन्ट्र्क्शन्स मध्येच लेख अनेक प्रतीमध्ये पाठवतांना लेखकांनी स्वत:चे नाव केवळ दर्शनिपेजवर लिहावे इतरत्र लेखात कुठेही लेखकाने स्वत:चे नाव लिहु नये असे लिहिले असेल तर समजावे की सदरिल नियतकालिक हे डबल ब्लाइंड पीर रिव्हयु तंत्राचा वापर करत आहे. म्हणजे रिव्हयू करिता तज्ञांकडे तो लेख पाठवतांना लेखकांची नावे झाकली जातात किंवा लपवली जातात. विद्यावार्ता जर्नल डबल ब्लाइंड नाही.
स्कॉलरली नियतकालिकामध्ये सहसा जाहिराती छापलेल्या नसतात. विद्यावार्ता या पीररिव्हयु जर्नल मधील लेखांना एक प्रमाणीत फॉरमॅट असतो. प्राकृतिक व सामाजिकशास्त्र यावरील लेखाचा एक फॉरमॅट असतो जो सहसा आपल्यातला संशोधन प्रबंधात पहायला मीळतो. कांही लेखक मात्र संशोधन अहवालाची जशीच्या तशी प्रतिकृती लेख स्वरुपात पाठवतात. कारण जर त्या लेखातील विचार दुस-या लेखकाला खोडावयाचे असतील किंवा सहमती दर्शवायची असेल तर हा फॉरमॅट कामी येतो. विद्यावार्ता या जर्नल मधील लेखाचा प्रमाणीत फॉरमॅट कसा असतो ते आपण पाहुयात
१. लेखाचे शिर्षक, लेखकाचे नाव, पद, संस्थेचे नाव, पत्ता.
२. अॅबस्टॅक्ट (सार)
३. नमुना-शब्द (किवर्डस)
४. प्रस्तावना आणि समस्याची उकल
५. संबंधीत लेखन साहित्याचा आढावा
६. संशोधन पध्दत
७. आधारसामग्री संकलन (डेटा कलेक्शन )
८. विश्लेशन
९. समारोप, निकष, सुचना व भविष्यात संबंधीत विषयात संशोधनाच्यात संधी
१०. संदर्भसुची
वरील बाबींची पुर्तता करून विद्यावार्ता नावाची आंतरविद्याशाखीय बहुभाषिक संशोधन पत्रिका गेल्या तीन वर्षापासून प्रकाशित होत आहे. यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील कोणत्याही विषयाचे संशोधन लेख प्रकाशित करता येतात. आपले लेखन vidyawarta@gmail.com या E Mail वर पाठवावे. लेखन ISM DVB TT Dhurv अथवा कृतीदेव ५५ या मराठी font मध्ये अथवा times new roman मध्ये चालते. ते एमएस वर्ड अथवा पेजमेकर या प्रोग्राममध्ये असावे.
अधिक माहितीसाठी 7588057695 अथवा 9850203295 या क्रमांकवर संपर्क करा. अथवा खालील लिंकवर क्लिक करा
https://sites.google.com/site/02wartajournal
संपादक
डॉ. बापूजी घोलप
हर्षवर्धन पब्लिकेशन प्रा. लि.
बीड ४३१ १२२(महाराष्ट्र)