!! वाचेल तो वाचेल !!
1- महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट म्हणजे “थाॅमस पेन” यांनी लिहिलेले “राईट्स ऑफ मॅन “नावाचे पुस्तक या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली.
2 – डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न झाले याचे मूळ हे केळुसकर गुरूजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र हे पुस्तक आहे.
3- भगतसिंग यांना इंग्रजानी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सकाळी फाशी देणार तर आदल्या रात्री भगतसिंग हे एक पुस्तक वाचत होते त्या वेळी तेथील जेलरने भगतसिंग यांना विचारले की “तुला तर उदया फाशी देण्यात येणार आहे ; मग हया पुस्तक वाचण्याचा काही उपयोग होणार नाही !! त्या वेळी भगतसिंग जेलरला म्हणाले की “माझ्या वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील “.
4- भगतसिंग यांनी तुरूंगात असताना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करून उपोषण केले होते.
5 – वाचन हा शब्द कसा तयार झाला?
वचन- म्हणजे शपथ ;
एखादे काम पूर्ण करण्यासाठी किंवा त्या मार्गावर चालण्यासाठी केलेला निर्धार शपथ चा अर्थ –
श- शतक ; 100 टक्के
पथ- मार्ग किंवा रस्ता
म्हणजे शंभर टक्के यशाकडे जाणारा मार्ग होय.
वचन चा अर्थ शपथ,
शपथ चा अर्थ यशस्वी मार्ग,
यावरून वाचन चा अर्थ हा शंभर टक्के यशस्वी मार्ग होय.
6 – बाबासाहेबानी पुस्तकासाठी राजगृह नावाचे एक घरच बांधले होते, ज्यात हजारो पुस्तक होती.
7 – अब्राहम लिंकन हा तर पुस्तकवेडा माणूस होता, एकदा तर शेजार्याकडून घेतलेले पुस्तक पावसात भिजल्याने त्या पुस्तकाची मजूरी म्हणून पुस्तक देणा-याकडे काम केले.
8 – नेपोलियन बोनापार्टने वाचलेल्या पुस्तकाची यादी आजही पॅरिसमधील वस्तुसंग्रहालयात आहे.
9 – “अवंतिका” हे एक पुस्तक असून ते लिहणारी लेखिका तिचे नाव स्नेहलता दसनूरकर आहे, तिचे ते पुस्तक मिळवण्यासाठी नंबर लावावा लागतो.
10- मराठीतील पद्मा गोळे नावाची लेखिका होत्या त्यांचा मृत्यू काही मिनिटावर असताना त्यांना उठता, बसता येत नव्हते.
त्यामुळे त्या झोपून शेवटी पुस्तकाची एक एक पाने फाडून वाचत असत व पुस्तक वाचताना मरण पावल्या.
11 – आज भारतात सर्वात संपन्न जर कोणता धर्म असेल तर तो “शीख धर्म” आहे याचे कारण काय तर शीख धर्माने ग्रंथाला गुरू मानून धर्मग्रंथाचा दर्जा दिला, तो “गुरूग्रंथसाहीब” हा धर्मग्रंथ आहे.
1 2 – लिंगायत धर्माचा धर्मग्रंथ सुद्धा “वचन साहीत्य” म्हणजे पुस्तक आहे.
बसवेश्वर यांची वचने छापील रूपात आणण्यासाठी कर्नाटकमधील हळकटटी नावाच्या माणसाने स्वतःचे घर विकून टाकले व रस्त्यावर राहायला लागला.
!! पुस्तक कोणते वाचावे?? !!
काही लोक ईश्वराला मानणारी आहेत, ती आस्तिकवादी पुस्तक वाचतात.
काही नास्तिक आहे, ती नास्तिकवादी पुस्तके वाचतात.
पण मला वाटते आपण आस्तिकवादीही वाचू नये व नास्तिक वादीही वाचू नये तर आपण वास्तववादी पुस्तके वाचली पाहीजे
1 3- कोणत्याही एका विषयाची पुस्तक जमा करून दहा वर्ष त्यावर चिंतन करा, अकराव्या वर्षी तुमची गणना एका विद्वानात केली जाईल.
14- ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर होईल भूईसपाट
15- पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते व सशक्त मस्तक कोणासमोर डोळे झाकून नतमस्तक होत नाही
16- आपण गेल्यावर लोकांनी आपणाला विसरू नये असे वाटत असेल तर दोनपैकी एक काम करा
एक लिहिण्यासारखे काहीतरी काम करा किंवा वाचण्यासारखे काहीतरी लिखाण करा…
धन्यवाद !!
आपलाच:-पुस्तकवादी